या अर्थसंकल्पात बऱ्याच गोष्टी चांगल्या असल्याचेही ठाकरे म्हणाले. मात्र, असे असले तरी हायड्रोजन मिशन एअर पोल्युशनबाबत अर्थसंकल्पात काहीच नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
देशात करोनाचे संकट अजूनही दूर झालेले नाही. अशा परिस्थितीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा पहिला पेपरलेस अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात मोदी सरकारची नजर आगामी विधानसभा निवडणुकांकडे आहे अशी विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे. पश्चिम बंगालच्या रस्त्यांसाठी २५ हजार कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलीय.
४ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशांत निवडणूक
या वर्षी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांमध्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांत विधानसभा निवडणूक होणार आहेत. पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांतील निवडणुका मात्र केंद्रातील सत्ताधारी भाजपला इतक्या सहज सोप्या नाहीत. हेच लक्षात घेत या अर्थसंकल्पात काही तरतुदी करण्यात आल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनीही साधला निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पातील राजकारणाकडे अंगुलीनिर्देश केला आहे. अर्थसंकल्प हा देशासाठी हवा, निवडणुकांसाठी असू नये, अशा परखड शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राकडून पुन्हा एकदा महाराष्ट्रावर अन्याय करण्यात आला, अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी अर्थमंत्री आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख नेत्यांनी अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times