नवी दिल्ली: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात ( ) आंदोलन ( ) करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिल्लीत घुसणं अवघड होणार आहे. कारण सरकारने आंदोलनांच्या ठिकाणी दिल्लीकडे जाणाऱ्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त केला आहे. तसंच बॅरिकेड्सच्या भींतींसह लोखंडी टोकदार सळया रस्त्यांवर लावल्या आहेत.

टिकारी सीमेवर ( tikri border ) सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या ठिकाणी सीसीची भिंत ( सिमेंट ब्लॉक ) यापूर्वीच इथे बांधली गेली होती. बॅरिकेडिंगचे सात थर लावण्यात आले होते. पण आता रस्ता खोदून तिथे त्यामध्ये लांब खिळे आणि टोकदार सळया बसवण्यात ( iron nails along concrete barricades) आल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी इथे सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. सीमेवर रोड रोलर देखील आणण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर हे रोड रोलर उभारले जाऊ शकतात. इथल्या बऱ्याच थरांची सुरक्षा सीमेवर होती.

यानंतर टिकरी कला गावापर्यंत ठिकठिकाणी बॅरिकेडिंगची भिंत उभारली गेली. दिल्ली पोलिसांनी टिकरी सीमेवर सीसीची भिंत बनवली होती. ही भिंत चार फूट जाड आहे. यापासून १० पावलांवर दिल्लीकडे जाणार्‍या एमसीडी टोलजवळ सीमेवर एक रस्ता खोदण्यात आला आहे आणि सिमेंटमध्ये लोखंडी टोकदार खिळे बसवण्यात आले आहेत. यासह येथे लोखंडी अणुकुचीदार सळया बसवण्यात आल्या आहेत. जेणेकरुन येथून कोणतंही वाहन जाऊ शकत नाही. इथून येणाऱ्या जाणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.

शेतकऱ्यांनी इथून दिल्लीत ट्रॅक्टरने घुसण्याचा प्रयत्न केला तर ते पंक्चर होईल. संपूर्ण टायर खराब होईल. येथून बाहेर पडणं कठीण होईल. आधीच सीमेवर सुरक्षा दलाच्या १५ कंपन्या तैनात आहेत. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसक घटनांनंतर येथे दररोज सुरक्षा अधिक कडक केली जात आहे. यातच आता लोखंडी खिळे बसवण्यात आले आहेत.

कोणत्याही शेतकऱ्याला इथून दिल्लीला जाऊ दिले जाणार नाही, असं दिल्ली पोलिसांनी सांगतिलं. एकही शेतकरी दिल्लीच्या सीमेत घुसू शकणार नाही अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे वाढती सुरक्षा व्यवस्था आणि दररोज होणाऱ्या बॅरिकेडिंगमुळे शेतकऱ्यांमध्येही भीती पसरली आहे. देशाच्या अन्नदात्यांना रोखण्यासाठी अशी व्यवस्था केली जातेय जसे आम्ही शेतकरी नसून त्रास उपद्रवी आहोत, असं शेतकरी म्हणाले.

बॅरिकेड्स केली जातेय वेल्डिंग

आंदोलकांनी दिल्लीत जाऊ नये म्हणून आता पोलिसांनी सिंघू सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. बॅरिकेड्सना वेल्डींग करून ते मजबुत केले जात आहे. तसंच मधली जागा सिमेंट किंवा राडारोडा टाकून ते भरली जात. जेणेकरुन आंदोलक ट्रॅक्टरद्वारे बॅरिकेड्स हटवू शकणार नाही. याशिवाय कंटेनरमध्येही सिमेंटची बॅरिकेड्स ठेवण्यात आली आहेत.

शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनामुळे स्थानिक नागरिकही संतापलेले आहेत. शेतकऱ्यांनी सीमा खाली करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here