नवी दिल्ली: इस्त्रायलशी जवळचे संबंध असल्याने स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी ( ) यांनी मित्र देशाला आश्वासन दिलं आहे. इस्रायलचे राजदूत आणि नागरिकांना पूर्ण सुरक्षा मिळेल, असं मोदी म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यानंतर पंतप्रधान मोदींनी दिलेले या आश्वासनानंतर दोन्ही देशांमधील संबंध किती दृढ आहेत, हे स्पष्ट होतं.

भारत संपूर्ण शक्ती लावेल…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इस्त्रायलचे पंतप्रधान ( ) यांच्याशी बोलले. आणि २९ जानेवारीला इस्रायली दूतावासाबाहेर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ( ) निषेध केला. या दहशतवादी घटनेतील दोषींना शिक्षा करण्यासाठी भारत आपल्या सर्व यंत्रणेचा वापर करेल, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली. यांनी नेतान्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. इस्रायली राजदूत आणि त्यांच्या परिसरातील सुरक्षेला भारत सर्वाधिक महत्त्व देतो, असं पंतप्रधान मोदींनी त्यांना आश्वासन दिलं. या संदर्भात दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांच्या तपास यंत्रणांमधील परस्पर समन्वयाबद्दल समाधान व्यक्त केलं, असं निवेदनात म्हटले आहे.

दोन्ही नेत्यांनी चर्चेत आपआपल्या देशांमधील कोविड -१९ विरोधी लढाईच्या प्रगतीवर चर्चा केली आणि या दिशेने सहकार्याच्या शक्यतांवर चर्चा केली.

दिल्लीत इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटानंतर काही वेळातच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवल यांनी आपल्या इस्रायली समकक्ष मीर बेन शब्बत यांच्याशी संपर्क केला आणि स्फोटानंतरची परिस्थिती आणि सध्या सुरू असलेल्या तपासाची माहिती त्यांना दिली.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरही इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री गबी अश्केनजी यांच्याशी बोलले. त्यांनी राजदूत आणि दूतावासाला पूर्ण सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन दिले आहे. भारताने ही घटना ‘गंभीरतेने’ घेतली आहे, असं जयशंकर यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीच्या लुटियन्स भागात इस्रायली दूतावासाबाहेर कमी तीव्रतेचा आयईडी स्फोट झाला. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण त्यात काही गाड्यांचं नुकसान झालं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान मोदी हे त्यावेळी बीटिंग रिट्रीट कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमापासून काही किलोमीटर अंतराव हा स्फोट झाला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here