दरम्यान, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सरकारला आवाहन केलं आहे. सरकारने चर्चेतून तोडगा काढवा. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. किसान मोर्चातील ४० संघटनांच्या सदस्यांची समिती आहे. सरकारने या समितीशी चर्चा करावी, असं शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले.
दिल्लीच्या विविध सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट केली आहे. टिकरी सीमेवर यापूर्वी सीसीची भिंत उभारली गेली होती. तसंच सात थराची बॅरिकेडिंग करण्यात आले होते. पण आता रस्ता खोदून त्यामध्ये मोठमोठे खिळे आणि टोकदार सळया बसवण्यात आल्या आहेत. खिळ्यांसह पोलिसांनी मोठ मोठ्या सळया रस्त्यांवर ठोकल्या आहेत. कुठल्याही मोठ्या वाहनाने जबरदस्तीने दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला तर त्या वाहनाचे टायर यामुळे फुटतील. सीमेवर रोड रोलर देखील उभारले गेले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर रोड रोलर उभारले जाऊ शकतात.
सिंघू सीमेवर पोलिसांनी आता सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. आता बॅरिकेड्सना वेल्ड करून मधल्या मोकळ्या जागेत भराव आणि सिमेंट टाकून भक्कम करण्यात येत आहे. गाझीपूर हे सीमावर्ती शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनले आहे. येथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या ठिकाणी एका रात्रीत १२ थरांचे बॅरिकेडिंग बसवण्यात आले आहे. २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना गाझीपूर सीमेवरुन हटवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यामुळे कमकुवत झालेल्या शेतकरी आंदोलनाने पुन्हा जोर पकडला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times