पुणे: जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींच्या आणि उपसरपंचपदांच्या निवड प्रक्रिया नऊ आणि दहा फेब्रुवारीला होणार आहेत. हद्दीत समाविष्ट झालेल्या शेवाळवाडी आणि औताडे-हांडेवाडी या दोन ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये सभासद संख्या कमी असल्याने किंवा एकही सभासद नसल्याने या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. यांनी दिले आहेत. ( Latest News Update )

वाचा:

सरपंच आणि उपसरपंचपदाच्या आरक्षण सोडती २९ जानेवारीला काढण्यात आल्या. आता या पदांची निवड प्रक्रिया घेण्यासाठी ग्रामपंचायतींच्या प्रथम सभा घेण्यात येणार आहेत. या निवड प्रक्रिया अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या असल्याचे ग्रामपंचायत शाखेचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले.

वाचा:

पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या वडाचीवाडी, शेवाळवाडी आणि औताडे-हांडेवाडी या तीन ग्रामपंचायतींपैकी वडाचीवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध झाली. औताडे-हांडेवाडी ग्रामपंचायतीमध्ये नऊ जागा होत्या. त्यापैकी आठ जागांवर कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. एका जागेवर फक्त एकाच उमेदवाराचा अर्ज आल्याने ही जागा बिनविरोध निवडून आली. शेवाळवाडी ग्रामपंचायतीमध्ये ११ जागा होत्या. एका जागेसाठी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या ठिकाणी निवडणूक झाली. अन्य जागांवर कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे एका जागेसाठी या गावातील नागरिकांना मतदानाची प्रक्रिया करावी लागली.

वाचा:

औताडे हांडेवाडी आणि शेवाळवाडी येथे सदस्यसंख्या कमी असल्याने या ठिकाणी प्रशासक नेमण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.
या ग्रामपंचायतींसह पुरंदरमधील पिंगोरी ग्रामपंचायतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला. तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्यात आले असल्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोणीही अर्ज दाखल न केल्याने निवडणूक झाली नाही. त्यामुळे या दोन ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here