मुंबई: शिवसेना नेते व प्रवक्ते यांची कन्या पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे पुत्र मल्हार हे लवकरच विवाहबद्ध होत असून रविवारी या दोघांचा साखरपुडा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात पार पडला. या सोहळ्यात राज्याचे विरोधी पक्षनेते आणि संजय राऊत यांची झालेली गळाभेट सध्या बरीच चर्चेत असून राऊत यांनी या गळाभेटीवर आपल्या खास शैलीत स्पष्टीकरण दिले आहे. ( )

वाचा:

पूर्वशी-मल्हार यांच्या साखरपुड्याला राजकारणातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. मुख्यमंत्री , राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते सपत्नीक या सोहळ्याला हजर राहिले. त्याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, यांनीही या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली. फडणवीस यांनी पूर्वशी व मल्हार यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्यानंतर संजय राऊत यांनी फडणवीस यांची गळाभेट घेतली. कॅमेऱ्याने हा नेमका क्षण टिपला आणि त्याचीच चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

वाचा:

संजय राऊत यांना माध्यमांनी फडणवीस यांच्या गळाभेटीबाबत विचारले असता त्यांनी या गळाभेटीवर नेमकं भाष्य केलं. फडणवीस आणि माझ्या गळाभेटीत काय गैर आहे?, असा सवाल करतानाच ही काही शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती, अशी तीरकस प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. महाराष्ट्रात अशाप्रकारे कुणी कुणाची गळाभेट घेत नाही का? अशाप्रकारे विचारधारा, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकमेकांच्या घरी समारंभासाठी जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. हीच परंपरा आम्ही जपत आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावेळीही तुम्ही सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती पाहिले आहे. त्यामुळे या गळाभेटीकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची आवश्यकता नाही, असे राऊत पुढे म्हणाले.

वाचा:

दरम्यान, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. दोघांनीही तिथे एकत्र जेवणही घेतलं होतं. या भेटीनंतर तेव्हा बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा काहीतरी शिजतंय, असे तर्कही लावले गेले. मात्र, दोन्ही नेत्यांनी तेव्हाही अगदी स्पष्ट शब्दांत या साऱ्या शक्यता फेटाळल्या होत्या. एक पत्रकार आणि विरोधी पक्षनेता यांची ही भेट होती. मुलाखतीच्या नियोजनासाठी ही भेट झाली, असेही दोन्ही नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले होते.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here