नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर आज संसदेत घमासानाची चिन्हं आहेत. काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी राज्यसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चेसाठी नोटीस दिली होती. तसंच इतर विरोधी दलांकडूनही शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चेची मागणी केलीय.

LIVE अपडेट- राज्यसभेचं कामकाज १०.३० वाजता पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर विरोधकांनी शेतकरी मुद्यावर मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. कृषी कायद्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गोंधळानंतर सदनाचं कामकाज पुन्हा एकदा सकाळी ११.३० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलंय.

राज्यसभेचं कामकाज स्थगित

– विरोधी खासदार पुन्हा एकदा सदनात परतल्यानंतर परत घेण्यासाठी त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज १०.३० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलंय.

सभापतींनी चर्चेस नकार दिल्यानंतर ‘शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घ्या’ असं म्हणत विरोधकांनी राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी केली आणि सर्व विरोधकांनी सदनातून ‘वॉक आऊट’ केलं आणि शून्यकाळ सुरू झाला.

‘कृषी कायद्यांवर चर्चेची गरज नाही’

– कृषी कायद्यावर आणि शेतकरी आंदोलनासंबंधी विरोधकांनी केलेली चर्चेची मागणी राज्यसभेची सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावलीय. ‘कृषी कायद्यांवर अगोदरच चर्चा झालीय, त्यामुळे आता या चर्चेची गरज नाही’, असं म्हणत नायडू यांनी विरोधकांची चर्चेची मागणी उडवून लावली.

– ‘तुम्हाला हवं असेल तर तुमच्यासमोर चर्चेचा रेकॉर्ड मांडता येऊ शकतो. शेतकरी आंदोलनावर आज नाही तर उद्या चर्चा होईल’, असं व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं.

भाजपकडून राज्यसभेत हिंदू मंदिराचा मुद्दा

– भारतीय जनता पक्षाचे खासदार जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी राज्यसभेत ‘शून्यकाळ’ नोटीस दिली. आंध्र प्रदेशात हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ला प्रकरणात आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आलीय.

विरोधकांकडून शेतकरी मुद्यावर चर्चेची मागणी

– तीन कृषी कायद्यांविरुद्ध सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर विरोधी दलांनी राज्यसभेत दिला आहे. आरजेी खासदार मनोज झा, तृणमूल खासदार सुखेंदू शेखर रे, डीएमके खासदार तिरुचि सिवा, सीपीएम खासदार ई करीम यांनी हा स्थगन प्रस्ताव देत शेतकरी मुद्यावर चर्चेची मागणी केलीय.

– तृणमूल काँग्रेसच्या खासदार अर्पिता घोष यांनीही शेतकरी मुद्यावर चर्चेसाठी नोटीस दिली आहे. विरोधकांकडून शेतकरी मुद्यावर चर्चेची मागणी करण्यात येतेय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here