नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार आणि यांनी आज दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली. गेल्या ६९ दिवसांपासून दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर हे आंदोलक शेतकरी केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेले कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर आपण शेतकऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.

‘सीमेवर आंदोलनकर्त्यांच्या भेटीदरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांची आपण भेट घेतली. आमच्या संवेदना आणि पाठिंबा व्यक्त केला. सरकारनं शेतकर्‍यांशी योग्य पद्धतीनं संवाद साधायला हवा’ असं म्हणतानाच ‘अहंकार देश चालवण्यासाठी मदत करणार नाही’, अशी चपराकही खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारला लगावलीय.

नोव्हेंबर २०२० पासून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय परतणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी वेळोवेळी व्यक्त केलाय. सर्वोच्च न्यायालयाकडून वादग्रस्त कायद्यांना स्थगिती देण्यात आली असली तरी केंद्राकडून मात्र हे कायदे मागे घेतले जाणार नसल्याचंच सांगितलं जातंय.

गाझीपूर सीमेवर आज खासदार संजय राऊत दाखल होत आहेत. सोबतच, एकप्रकारे या शेतकरी आंदोलनात शिवसेनेची एन्ट्री होतेय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here