मुंबई: ‘कृषी कायद्याविरोधात शेतकरी महिनोंमहिने आंदोलन करत बसले आहेत. लोक मरत आहेत परंतु पंतप्रधान ठोस निर्णय घेत नाहीत. काय बिघडणार आहे शेतकऱ्यांना न्याय दिला तर? कृषी कायदे रद्द केले तर?,’ असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी केला.

‘करोनाचा काळ असताना बायका-पोरं घेऊन थंडी वार्‍यात शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. त्यांना कोणी खलिस्तानी म्हणतंय तर कोणी पाकिस्तानी बोलतंय. अरे काय चाललंय हे? असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला.

वाचा:

‘अन्नधान्याच्या बाबतीत हा देश दुष्काळी होता तेव्हा या शेतकऱ्यांनी आपल्यासाठी अन्नधान्य पिकवलं. उत्पादन वाढवलं आणि परदेशातही निर्यात करण्याइतपत क्षमता निर्माण केली. या शेतकऱ्याला दोन-दोन महिने आंदोलन करावं लागत आहे. दोन-चार दिवस शेतकऱ्यांनी आंदोलन केलं असतं तर समजू शकलो असतो. पण दोन-दोन महिने? तरीही पंतप्रधान याकडं लक्ष द्यायला तयार नाहीत. कृषी कायदे रद्द करा. मागे घ्या. नवीन कायदा बनवायचा असेल तर नवीन बनवा, पण शेतकर्‍यांबरोबर चर्चा करा, असा सल्ला भुजबळ यांनी दिला.

अर्थसंकल्पातील घोषणांची उडवली खिल्ली

मोदी सरकानं काल जाहीर केलेल्या अर्थसंकल्पावरही भुजबळ यांनी टीका केली. ‘ज्या राज्यात निवडणुका आहेत, त्याच राज्यांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. परंतु तीही मिळणं कठीण आहे. बिहारचं उदाहरण समोर आहे. १० हजार कोटी… २० हजार कोटी… असं करत करत पंतप्रधान मोदी यांनी दीड लाख कोटी जाहीर केले होते. पण निवडणूक संपली आणि सगळे संपले. आताही जाहीर झालेले ३५ हजार कोटी… ६५ हजार कोटी रुपये निवडणूकपूर्वी खर्च होणार आहे का? असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here