वाचा:
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मनसेच्या स्थापनेपासून राजेश कदम हे पक्षात कार्यरत होते. डोंबिवली शहरात वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मात्र, मागील काही दिवसांपासून ते नाराज होते. अखेर त्यांनी सोमवारी शिवबंधन हाती बांधले. त्यांच्या पक्षांतरामुळं मनसेला मोठा धक्का बसल्याची चर्चा होती. मात्र, मनसेनं विचलित न होता राजेश कदम यांच्या जागी नव्या चेहऱ्याची नियुक्ती केली आहे.
डोंबिवली शहराध्यक्ष पदी मनसेनं यांची नियुक्ती केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते. मनोज घरत याची नेमणूक एक वर्षासाठी असेल. त्यानंतर त्यांचा कार्यअहवाल पाहून मुदतवाढ देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times