मंदार हळबे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामानं प्रेरित झालो आणि सर्वांगीण विकास आणि उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी भाजपप्रवेश करत असल्याचं, मंदार हळबे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, दहा वर्ष ज्या पक्षानं नेतृत्वाची संधी दिली, त्या पक्षाबाबतही कोणतीही नाराजी नसल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं आहे.
वाचाः
कृष्णकुंजवर खलबतं
२४ तासांत दोन नेत्यांनी पक्षांतर केल्यानंतर मनसेच्या गोटात अस्वस्थता पसरली असल्याचं सांगण्यात येतंय. कल्याण- डोंबिवली मनसेला दोन हादरे बसल्यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी तातडीने कृष्णकुंजवर जात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर हेदेखील उपस्थित होते. महापालिकेच्या निवडणुकींसाठी आता पक्षाची पुढची दिशा काय असेल याविषयी चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय.
वाचाः
कोण आहेत मंदार हळबे
मंदार हळबे हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील विद्यमान गटनेते आहेत. तसंच, ते गेल्या दहा वर्षांपासून कल्याणचे नगरसेवक देखील राहिले आहेत. २०१०मध्ये हळबे यांनी मनसेत प्रवेश करत उमेदवारी मिळवली होती. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून डोंबिवली विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती मात्र, त्यांचा पराभव झाला.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times