केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचं स्वागत करताना भाजप नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमृता फडणवीस यांनीही एक ट्विट करत अर्थसंकल्पाचे व मोदी सरकारचे कौतुक केलं आहे. ‘मागील १०० वर्षांत कधी पाहण्यात आला नाही अशा पद्धतीने अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल निर्मला सीतारामन यांचे आभार. कराचा बोजा सर्वसामान्यांवर न टाकता विकासाला प्रेरणा कशी द्यायची हे सर्व दे आपल्याकडून शिकतील,’ असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.
वाचाः
अमृता फडणवीस यांनी हे ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्ष झाली आहेत आणि गेल्या १०० वर्षाच्या बजेटबद्दल बोलतोय, अशीआठवण त्यांना नेटकऱ्यांनी करुन दिली आहे. तर, एकानं भारत स्वातंत्र्य होऊन १०० वर्ष झाली का?, असा प्रश्न केला आहे. तर, एका युझरनं भारताला स्वातंत्र्य मिळूनच ७४ वर्षे झाली मग तुम्ही १०० वर्षातील चांगला अर्थसंकल्प असे कसे म्हणू शकता? यापूर्वी देशात इंग्रजांनीच चांगला बजेट सादर केला होता, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? असं म्हटलं आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times