मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. शिवसेनेनं या अर्थसंकल्पाचं ‘स्वप्नांची सैर’ अशा शब्दांत वर्णन केल्यानंतर आता काँग्रेसनंही तोफ डागली आहे. ‘अंबानी व अदानी यांना काय काय विकायचं याचं सुतोवाच करणारा हा अर्थसंकल्प होता,’ अशी जळजळीत टीका काँग्रेसचे खासदार यांनी केली आहे. (Congress MP on )

वाचा:

‘मागील वर्षी निर्मला सीतारामन यांनी दोन तासांहून अधिक काळ बजेटचं वाचन केलं होतं. यावेळी त्यांनी आपलं भाषण लवकर संपवलं त्याबद्दल आभार,’ असा चिमटा काढत, राजीव सातव यांनी अर्थसंकल्पावर भाष्य केलं आहे. ‘हा अर्थसंकल्प पेपरलेस तर आहेच पण ‘सेन्सलेस’ही आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. शेतकरी व सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पात काहीही नाही. करोनानंतर ढासळलेल्या अर्थव्यवस्थेत प्राण फुकण्यासाठी देखील कुठलीही तजवीज नाही. तीन वर्षांत होईल, पाच वर्षांत होईल असे वायदे अर्थमंत्र्यांनी केले आहेत. पण येत्या आर्थिक वर्षात काय करणार याबद्दल काहीच सांगितलेलं नाही. केवळ पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तेथील मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे बजेट तयार करण्यात आलं आहे,’ असा आरोप सातव यांनी केला.

वाचा:

‘काँग्रेसनं ६० वर्षांत काय केलं असं भाजपवाले नेहमी विचारायचे. ते भाजपवाले आज काँग्रेसनं उभी केलेली बीपीसीएल, एलआयसी आणि मोठमोठ्या बंदरांचं बंदरांचं खासगीकरण करण्याचा अजेंडा राबवत आहेत. अंबानी, अदानीला काय काय विकायचं आणि त्यांचं कसं भलं करायचं हाच या बजेटचा अजेंडा आणि अर्थ आहे,’ असं सातव म्हणाले. ‘महाराष्ट्राच्या वाट्याला काय येणार हे २०२४ ला कळेल. कारण त्या वर्षी आपल्याकडं निवडणुका आहेत,’ असा टोलाही सातव यांनी हाणला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here