मुंबई : गोरेगाव पश्चिम भागात असलेल्या एका स्टुडिओला लागली भीषण आग लागून () स्टुडिओतील सामान जळून खाक झाले आहे. बांगुल नगर येथील मोकळ्या जागेत हा स्टुडिओ उभारण्यात आलेला आहे. आज दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमाराला ही भीषण आग लागली. या आगीमध्ये जीवितहानी झाली की नाही, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या आगीमध्ये स्टुडिओतील सर्व सामान जळून खाक झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे ८ बंब पोहोचले असून अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. ( in a studio in )
ही आग लागली त्यावेळी स्टुडिओतील सामानाचे विलीनीकरण करण्यात येत होते. या आगीत हे सर्व सामान जळून गेले आहे. आगीच्यावेळी अनेक व्हॅनिटी व्हॅन तेथे उपस्थित होत्या. मात्र अद्याप जीवितहानी झाली की नाही? याबाबत माहिती मिळाली नाही.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times