मुंबईः शिवसेनेचे खासदार यांनी आज दिल्लीतील आंदोलकांची भेट घेतली आहे. संजय राऊत यांच्या या भेटीचे महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. भाजपनं संजय राऊतांवर निशाणा साधत त्यांच्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार संजय राऊत यांनी आज आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. तसंच, शेतकरी नेते राकेश टिकैत यांचीही राऊतांनी भेट घेतली आहे. राऊतांच्या या भेटीवरुन भाजप नेते यांनी एक ट्विट केलं आहे.
वाचाः
निलेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत जितक्या झटपट दिल्ली येथे आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेले तसेच कधी मराठा आंदोलकांना भेटली नाहीत. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही आंदोलनाला राऊत कधी गेले नाहीत, महाराष्ट्रातले आंदोलनकर्ते नको फक्त महाराष्ट्र हे नाव पाहिजे राजकारण करायला, अशा शब्दांत राऊतांवर हल्ला चढवला आहे. तसंच, एक नंबर ढोंगी, अशी खोचक टीकाही केली आहे.
वाचाः
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times