कोल्हापूर महापालिकेची निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर लढविणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे ४१ हून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे ध्येय आहे. निवडणुकीनंतर कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर असेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष यांनी व्यक्त केला. दोन्ही काँग्रेसच्या हातात हात घालून पाच वर्षे महापालिकेत कारभार करणाऱ्या सेनेने स्वबळाचा नारा देतानाच महापौर पदावरही दावा केल्याने महाविकास आघाडीत धूसफूस सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. क्षीरसागर म्हणाले, हीच ती वेळ आहे,शिवसेनेचा महापौर करण्याची ! या घोषवाक्याद्वारे महापालिका निवडणुकीस सामोरे जाण्यास शिवसेना सज्ज आहे. निवडणुकीसाठी आघाडी झाली तर ठीक, अन्यथा स्वतंत्रपणे लढू. अन्य पक्षातील नगरसेवक, माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत. इलेक्टिव्ह मेरिटला प्राधान्य देऊन शिवसेनेचे नगरसेवक मोठया संख्येने निवडून आणू.
शिवसेना हा स्वाभिमानी पक्ष आहे. कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ईच्छा होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही कोल्हापूरवर विशेष प्रेम आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे, नगरविकासमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत. ही दोन्ही महत्वाची पदे शिवसेनेकडे असल्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला चालना देण्यासाठी महापालिकेतही शिवसेनेची एकहाती सत्ता असावी. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपली भूमिका पटवून देऊ.’निवडणुकीनंतर कोल्हापूरच्या महापौर, स्थायी समिती सभापतिपदासह अन्य महत्वाची पदे शिवसेनेकडे असतील.
पायाभूत सुविधासाठी मुख्यमंत्र्यांकडून आणखी २५ कोटी
गेल्या महिनाभरात मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूर दौऱ्यात शिवसेना पूर्ण ताकतीने आणि शिवसेनेचा महापौर करण्याच्या इराद्याने निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे, नगरविकासमंत्री शिंदे यांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. शहरातील पायाभूत सुविधासाठी आणखी २५ कोटी रुपये मुख्यमंत्री देणार आहेत. येत्या आठ दिवसात मुख्यमंत्री ठाकरे यांची पुन्हा भेट घेणार आहे. याशिवाय सरकारने कोल्हापूरच्या हद्दवाढीसंबंधी महापालिकेला फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. शहर आणि परिसरात अगोदर विकासकामे करणार मग निवडणूक असे सूत्र निश्चित केले आहे.’
क्लिक करा आणि वाचा-
पत्रकार परिषदेला शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी महापौर सरिता मोरे, देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, शिवसेनेचे नगरसेवक राहुल चव्हाण, नियाज खान, तेजस्विनी इंगवले, प्रतिज्ञा निल्ले, ऋतुराज क्षीरसागर आदी उपस्थित होते.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times