मुंबईः (coronavirus) संसर्गाबाबत आज काहीसे दिलासादायक वृत्त असून आज राज्यात एकूण ४ हजार ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज राज्यात एकूण १ हजार ९२७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. म्हणजेच नवे रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दुपटीहून अधिक आहे. तसेच आज राज्यात एकूण ३० करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या २७ इतकी होती. (maharashtra registered 1927 new cases in a day)

राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ३६ हजार ३०५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३७ टक्के इतके झाले आहे. तसेच राज्याचा मृत्यूदर २.५२ इतका आहे.

राज्यात अॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा खाली आला

दरम्यान, राज्यात आजच्या घडीला ४१ हजार ५८६ इतके अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. काल हीच संख्या ४३ हजार ७०१ इतकी होती.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोना बाधित रुग्णसंख्येचा आकडा वाढत होता. मात्र कालपासून नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. या बरोबरच, राज्यातील अॅक्टीव्ह रुग्ण संख्येचा आकडाही खाली येत आहे.

राज्यात आज १ हजार ९२७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या २० लाख ३० हजार २७४ इतकी झाले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५१ हजार १३९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर इतर कारणांमुळे एकूण १ हजार २४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या राज्यात १ लाख ८९ हजार २८८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर २ हजार १२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आज राज्यात एकूण ३० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील एकूण करोनामृतांची संख्या ५१ हजार १३९ इतका झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४७ लाख ६ हजार ९९२ चाचण्यांपैकी २० लाख ३० हजार २७४ (१३.८० टक्के) इतके नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईत सध्या ५ हजार ५३० रुग्ण उपचार घेत आहेत. तर, ठाण्यात ही संख्या ६ हजार ५५२, पुण्यात सर्वाधिक १३ हजार ४८७ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यात सर्वात कमी अॅक्टिव्ह रुग्ण गडचिरोलीत आहे. तेथे अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ७६ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here