वाचा:
(वय ५४, रा. तुमसर) असे या प्रकरणातील याचिकाकर्त्या महिलेचे नाव आहे. मुन्नीबाई यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती यांनी हे आदेश दिले. ही घटना १२ डिसेंबरला घडली होती. मुन्नीबाई यांचा मुलगा विक्की हा -हावडा या गाडीने नागपूरहून तुमसरला येत होता. यावेळी मुंडीकोटा रेल्वेस्थानकाजवळ घडलेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नुकसान भरपाई मिळावी म्हणून मुन्नीबाई यांनी रेल्वे न्यायाधिकरणाने अर्ज केला होता. हा अर्ज फेटाळला गेला. त्यानंतर त्यांनी याविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
वाचा:
सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने मुन्नीबाई यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. ‘विक्की याच्याकडे सापडलेले तिकीट लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसचे नव्हते. तरीही मुळात त्याच्याकडे तिकीट होते. त्यामुळे तो विनातिकीट प्रवास करीत नव्हता, हे स्पष्ट होते. तसेच त्याने तिकीट काढल्यानंतर चुकीची ट्रेन पकडली असेलही. मात्र, प्रवाशांनी चुकीची ट्रेन पकडू नये, यासाठी रेल्वेने स्थानकावर पुरेशा प्रमाणात माहितीचे फलक लावायला हवेत. तिकीट तपासणाऱ्यांच्या अनुपस्थितीत आपली गाडी चुकेल या भीतीने तो धावत्या रेल्वेगाडीतून पडला व यात त्याचा मृत्यू झाला असावा. त्याचा मृत्यू दुदैवी होता, एवढी दिलगिरी व्यक्त करून रेल्वे आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही. त्यामुळे रेल्वेने त्याच्या आईला ८ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी’, असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. हा आदेश अनेक अर्थांनी महत्त्वाचा असून रेल्वेला यामुळे हिसका मिळाला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times