म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुर्गदुर्गेश्वर () येथे कुठल्याही सुविधा न देता गडप्रवेशासाठी तिकीट आकारणे निषेधार्थ असल्याचे सांगत पुरातत्त्व खात्याचे (Archaeological Department) (Ticket house) काही शिवप्रेमींनी उलथवून टाकले.

तिकीटाच्या नावाखाली शिवप्रेमींकडून पैसे घेतले जातात, मात्र गडावर कुठल्याही सुविधा नाहीत. पुरातत्त्व खात्याकडून माणशी २५ रुपये तिकीटाची रक्कम म्हणून आकारली जाते. गडावर महादरवाजाजवळ पूर्वी हे तिकीटघर होते. गडाचे संवर्धन कार्य सुरू असले, तरी गडावर कुठल्याही सुविधा उपलब्ध नसल्याने शिवप्रेमींतर्फे हे पाऊल उचलण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा-

रायगडवाडीकडे उतरणाऱ्या खिंडीत चित दरवाजाचा पायरी मार्ग आहे. या पायरी मार्गाची नुकतीच दुरूस्ती करण्यात आली आहे. तिथेच नव्याने हे तिकीटघर उभारण्यात आले होते. शिवभक्तांनी ते उलथवून टाकले. महाडचे आमदार भरत गोगावलेही यावेळी उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here