मुंबई: मागील () सरकारच्या काळात आपल्याला सरकारने नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका मंत्र्याने खूप त्रास दिला होता, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ आणि वैद्यकीय शिक्षण संचालक (Dr. Tatyarao Lahane) यांनी दिले आहे. मागील सरकारच्या काळात आपल्याला खूप त्रास झाल्याचे डॉ. लहाने यांनी म्हटल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, आपल्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री () यांनी मदत केल्याचे डॉ. लहाने यांनी म्हटले आहे. (I was harassed by a minister not the fadnavis government says )

समाजकल्याण मंत्री यांच्या हस्ते डॉ. लहाने यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार वंजारवाडी येथे संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आला होता. यावेळी केलेल्या भाषणात भाजपाच्या एका मंत्र्याने आपल्याला त्रास दिला असे आपले म्हणणे होते. आपण असे बोललेलो असताना, त्याऐवजी फडणवीस सरकारने आपल्याला त्रास दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याचे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला कायमच पाठिंबा दिला. तसेच वेळोवेळी आपल्या त्यांनी सहकार्य केले, असे डॉ. लहाने यांनी म्हटले आहे. तेव्हाचे विरोधी पक्षनेते व आताचे मंत्री धनंजय मुंडे हेही कायम आपल्या पाठीशी उभे होते, असेही डॉ. लहाने पुढे म्हणाले. फडणवीस सरकारच्या काळात ‘नेत्रदानाचा महायज्ञ’ ही संकल्पना आपल्याला राबवता आली. तसेच नेत्रतज्ज्ञ म्हणून अनेक उपक्रमही मी राबवू शकलो असेही ते पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

‘सरकारने नव्हे, एका मंत्र्याने त्रास दिला’

मागच्या फडणवीस सरकारने आपल्याला त्रास दिलेला नाही. फडणवीस सरकारच्या सुरुवातीच्या काळात एका मंत्र्यामुळे आपल्याला त्रास झाला होता. मात्र, असे असले तरी देखील तेव्हाही देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन माझ्या पाठीशी उभे होते, असे डॉ. लहाने म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here