भेटीबाबत फडणवीस यांची भूमिका काय?
या भेटीचे कारण काय याबाबत मात्र मुनगंटीवार यांनी खुलासा केलेला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्चा ऐकायला येऊ लागल्या आहेत. भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या जवळ जाऊ पाहत आहे का?, राज्यात नवे समीकरण तयार होत आहे का?, मुनगंटीवार यांनी व्यक्तिगत कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली का?… असे एक ना अनेक प्रश्नांवर चर्चा रंगू लागल्या आहेत.
मुनगंटीवार यांनी घेतलेल्या मुख्यमंत्री यांच्या भेटीसंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांची भूमिका काय आहे, असा प्रश्नही मुनगंटीवार यांना विचारण्यात आला. मात्र जी माझी भूमिका आहे तीच देवेंद्र फडणवीस यांची असणार, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना हा पक्ष काँग्रेस पक्षाचा वैचारिक शत्रू आहे, मात्र भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन पक्ष शेवटच्या श्वासापर्यंत शत्रू नाहीत, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
केवळ इतर पक्षातीलच नाही, तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील नेते देखील या भेटीबाबत आश्चर्य व्यक्त करू लागले आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन असो, वाढील वीज बिलाचा मुद्दा असो की मेट्रो प्रकल्प असो, भारतीय जनता पक्षाने सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले आहे. असे असतानाही मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत भाजप आणि शिवसेना शेवटच्या श्वासापर्यंत शत्रू नाहीत असे वक्तव्य केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times