विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शरजील उस्मानी याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतक भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांनी ठाण्यात शरजील उस्मानीविरोधात तक्रार दाखल केली.
३० जानेवारी रोजी पुणे येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारी, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली आहेत. ‘आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो’, अशाप्रकारची ही गंभीर विधाने आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे, असे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. हा प्रकार समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे, असे नमूद करतानाच, हे पत्र मिळताच याप्रकरणी गुन्हा दाखल करून, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल, ही मला आशा आहे असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
गेल्या एल्गार परिषदेच्या वेळी काय झाले याची जाणीव असताना देखील अशा आयोजनांना पुन्हा परवानगी देणे किती चूक होते हेच शरजीलच्या विधानांतून दिसून येते अशी टिप्पणीही फडणवीस यांनी केली होती.
क्लिक करा आणि वाचा-
फडणवीस यांच्या या पत्रानंतर भाजपच्या युवा मोर्चाने ही तक्रार दाखल केली आहे. आता पोलिस पुढील कारवाई काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times