वाचा:
करोना संकटामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका गेले वर्षभर लांबणीवर पडत होत्या. तीन चार वेळा या निवडणुका लांबल्याने अनेक संस्थामध्ये विद्यमान संचालकांना मुदतवाढ मिळाली. काही ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच सरकारने या सर्व संस्थांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. मंगळवारी मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाचा:
गोकुळ दूध संघ, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समिती, राजाराम कारखाना, प्राथमिक शिक्षक बँकेसह अनेक बँका, कारखान्यांच्या निवडणुका आता जाहीर होणार आहेत. करोना संसर्ग कमी झाल्याने आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे. या सर्व संस्था जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम करणाऱ्या आहेत. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. पालकमंत्री , ग्रामविकास मंत्री , भाजपचे प्रदेशाध्यक्ष , आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times