नागपूर: दोन महिन्यांपूर्वी काश्मीर खोऱ्यात शत्रूच्या हल्ल्यात काटोलचे वीर पुत्र हे शहीद झाले होते. या घटनेने सतई कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला होता. या दुःखाच्या परिस्थितीत सतई कुटुंबीयांना राज्यातील ठाकरे सरकारने आर्थिक मदतीचा हात दिला आहे. वडील व आई मीराबाई यांना प्रत्येकी पन्नास लाख अशी एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. गृहमंत्री यांनी आज दोघांनाही धनादेश सुपूर्द केला. ( Martyr )

वाचा:

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने येथील पोलीस स्टेशन परिसरात शहीद भूषण सतई यांच्या कुटुंबीयांना एकूण एक कोटी रुपयांची आर्थिक मदत सरकारतर्फे देण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला, अतिरीक्त पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय अधिकारी उंबरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेश जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर शिल्पा खरपकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सैन्यात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक रवींद्र वानखेडे, विष्णू गोटे, नंदकुमार कोरडे, जयवंत चाकोले, अमोल राऊत यांचा गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहीद भूषण सतई यांचे कुटुंबीय धनादेश स्वीकारताना भावुक झाले होते.

वाचा:

माजी सैनिकांनी करावे प्रयत्न

‘ग्रामीण भागातील विशेषतः नागपूर विभागातील तरुणांना सैन्य भरती होण्यासाठी प्रवृत्त करायला हवे. आपल्या भागातील जास्तीत जास्त युवक-युवती सैन्यात भरती होतील, यासाठी माजी सैनिकांनी प्रयत्न करावे’, असे आवाहन यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी केले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here