पुणे: पुण्यातील केळेवाडी परिसरातील अकरा वर्षाच्या मुलाचा खून त्याच्या तेरा वर्षाचा मित्रानेच केल्याचे समोर आले आहे. मैदानात खेळत असताना झालेल्या वादात ढकलून दिल्यानंतर डोक्यावर पडून सदर मुलगा जखमी झाला. त्यानंतर घरचे रागवतील या भीतीने त्या मुलाच्या डोक्यात आणखी दगड घालून त्याला अर्धा गाढल्याचेही उघड झाले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. ( )

वाचा:

विश्वजित विनोद वंजारी (वय ११, रा. सर्व्हे क्रमांक ४४, केळेवाडी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. वंजारी हा २९ जानेवारी रोजी सायंकाळी चारच्या नंतर बेपत्ता झाला होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला जात होता. ३१ जानेवारी रोजी दुपारी पौड रस्त्यावरील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मोकळ्या प्लॉटमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा मृतदेह अर्धवट गाढलेला असल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता.

वाचा:

याबाबत कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मेघश्याम डांगे यानी सांगितले, विश्वजीत हा मुलगा बेपत्ता झाल्यापासून त्याचा कसून शोध सुरू होता. त्याचा मृतदेह आढळल्यानंतर डोक्याला मार लागल्यामुळे खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आरोपीचा शोध सुरू होता. मुलगा शेवटी कोणासोबत होता त्यावरून तपास करताना तेरा वर्षाच्या मुलावर संशय निर्माण झाला. त्यामुळे त्याबाबत चौकशी केली. त्यावेळी त्यानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले. विश्वजीत व आरोपी अल्पवयीन होते. ते दोघे एकत्र खेळायचे. त्यावेळी त्यांच्यात वादावादी होत होती. घटनेच्या दिवशीदेखील दोघे खेळत होते. त्यावेळी विश्वजित याने त्याला चिडविले. खेळताना सतत मला एकटे पाडतात, असे म्हणून त्यांच्यात वादावादी झाली. यावेळी झटापटीमध्ये आरोपीने विश्वजीत याचे नाक दाबले. त्यानंतर त्याला धक्का दिला. त्या ठिकाणी असलेल्या विटावर तो पडल्यामुळे डोक्याला गंभीर जखम झाली. त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. त्यामुळे आरोपी मुलगा घाबरला. आता घरचे रागवतील म्हणून त्याने आणखी एक दगड त्याच्या डोक्यावर टाकला. तो दिसू नये म्हणून त्याच्या अंगावर बाजूने दगडे रचली. त्या ठिकाणी सिमेंटचा राडारोडा टाकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुलास ताब्यात घेतले असून त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here