सीतापूर () : नेता द्रष्टा असला पाहिजे. त्यांना शिक्षण घेण्याची काहीही गरज नाही, असं अजब वक्तव्य योगी सरकारमधील मंत्री यांनी केलं आहे. ते सीतापूर जिल्ह्यातील महमूदाबाद येथे सेठ राम गुलाम इंटर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना बोलत होते.

शिकलेले लोक चुकीचं वातावरण निर्माण करतात. नेत्यांना शिक्षण घेण्याची गरज नाही. नेत्यानं शिकलं पाहिजे असं काही नाही. मी मंत्री आहे. माझ्याकडे स्वीय सहायक असतो. कर्मचारी वर्ग असतो. तुरुंगाचं काम मला थोडं करायचं आहे. तुरुंग अधीक्षक आहेत. ते कामकाज चालवतील, असं मंत्री जे. के. सिंह जैकी म्हणाले.

नेत्यांकडे दूरदृष्टिकोन असला पाहिजे. तुरुंगांमध्ये जेवण चांगलं पाहिजे असं मला सांगायचं आहे. तुरुंगाचा व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, नेत्याचं शिक्षण किती असावं, त्याच्या ज्ञान आणि पदवीला काही अर्थ नाही, असंही ते म्हणाले. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here