वाचा:
दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन तीव्र होत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तिथे मोठा फौजफाटा सध्या तैनात करण्यात आला आहे. त्यावरूनच नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘तुम्ही शेतकऱ्यांसाठी बंदोबस्त लावलाय की पाकिस्तान वा चीनच्या सीमेवर बंदोबस्त लावलाय’, अशी विचारणा करतानाच जनरल डायर नीतीने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपणे योग्य नाही’, अशा शब्दांत मलिक यांनी टोला लगावला. ही सगळी परिस्थिती निर्माण करून दडपशाहीच्या मार्गाने शेतकरी आंदोलन संपवण्याचा डाव केंद्र सरकारने आखला आहे. लोक हे कदापि स्वीकारणार नाहीत. ही डायर नीती केंद्राने तत्काळ थांबवावी, असेही मलिक यांनी केंद्र सरकारला ठणकावले.
वाचा:
शेतकऱ्यांना अटकाव करण्यासाठी चार-चार बॅरिकेटर लावले गेले आहेत. रस्त्यावर खिळे टाकण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे अन्न-पाणी बंद करायचे आणि त्यांची चहुबाजूने कोंडी करायची, असा प्रयत्न चालला आहे. ही लोकशाही पद्धत असूच शकत नाही. मोदी वेगळ्या पद्धतीने देश चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील जनता हे सहन करणार नाही, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.
वाचा:
दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष सुरुवातीपासूनच शेतकरी आंदोलनाच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. आजच खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी गाझीपूर सीमेवर जाऊन भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संदेश शेतकऱ्यांना देतानाच राऊत यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. सरकारने योग्य मार्गाने शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी. इतका अहंकार बाळगणे योग्य नाही, असे राऊत म्हणाले होते. त्यानंतर आता मलिक यांनीही केंद्राला लक्ष्य केले आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times