वॉशिंग्टन : ई-कॉमर्समधील दिग्गज कंपनी असलेल्या अॅमेझॉनचे संस्थापक आणि सर्वेसर्वा असलेल्या जेफ बेझॉस यांनी मोठी घोषणा केली आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक असलेल्या बेझॉस यांनी अॅमेझॉनच्या सीईओ पदावरून पाय उतार होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कॉर्पोरेट जगतात खळबळ उडाली आहे.

चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बेझॉस अॅमेझॉनच्या सीईओ पदावरून पाउतार होतील आणि त्याऐवजी कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील, असे कंपनीने म्हटलं आहे. अॅमेझॉनच्या वेब सर्व्हिसचे प्रमुख एंडी जेसी यांच्याकडे अॅमेझॉनच्या प्रमुख पदाची सूत्रे सोपवली जाणार आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here