कोलकाता: भारतीय संघातील जलद गोलंदाज () याने मंगळवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. डिंडाने भारताकडून १३ वनडे आणि ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने डिंडाने वनडेत १२ तर टी-२० मध्ये १७ विकेट घेतल्या आहेत.

वाचा-

बीसीसीआयचे आभार

मी आज क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत आहे. बीसीसीआय () आणि गोवा असोसिएशन (Goa Cricket Association)ला यासंदर्भात मेल पाठवला आहे. भारताकडून खेळण्याचे सर्वांचे स्वप्न असते. मी बंगालकडून खेळले आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. बीसीसीआयचे मनापासून धन्यवाद ज्यांनी मला भारताकडून खेळण्याची संधी दिली.

वाचा-

आयपीएलमधील कामगिरी

डिंडाने आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोलकाता नाइट रायडर्स, पुणे वॉरियर्स, रायजिंग पुणे सुपरजायट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने ७८ सामन्यात २२.२० च्या सरासरीने ६८ विकेट घेतल्या. डिंडाने २०१० साली झिम्बाब्वेविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. डिंडाने ११६ प्रथम श्रेणी सामन्यात ४२० विकेट घेतल्या. त्याने २६ वेळा डावात ५ विकेट घेतल्या. २००९ साली श्रीलंकेविरुद्ध टी-२० मध्ये पदार्पण केले.

वाचा-

नुकत्याच झालेल्या सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत डिंडा गोवा संघाकडून खेळला. लिस्ट ए च्या ९८ सामन्यात १५१ विकेट घेतल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here