म. टा. विशेष प्रतिनिधी,नागपूर

आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महानगरपालिकेत मागील १२ वर्षांपासून एका मृत कर्मचाऱ्याच्या नावे वेतन काढले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी याच्या चौकशीचे निर्देश देत पाच दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. महानगरपालिकेत हिरामण फडके हे हनुमाननगर झोनमध्ये ऐवजदार म्हणून कार्यरत होते. १९९८मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण, २०२०पर्यंत फडके यांच्या नावे वेतन काढण्यात आले. महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सतीश होले यांनी हा प्रकार महापौरांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकारासाठी एक अधिकारी जबाबदार असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्यावर चौकशीअंती कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here