म. टा खास प्रतिनिधी, नाशिक: आदिवासी भागातील शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असतील. इंग्रजी, गणित यांसारख्या विषयांकरिता शिक्षक सरकार उपलब्ध करून देत नसेल तर हे महाराष्ट्राचे राज्य सरकार करते काय?, अशी टीका राज्यपाल यांनी केली. राज्यपाल, क्रीडा मंत्र्यांनी सांगूनही कविता राऊत सारख्या गुणी खेळाडूला हे सरकार नोकरी देऊ शकत नसेल तर काहीतरी गडबड आहे, असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.

सुरगाणा तालुक्यातील भिंतघर या गुलाबी गावात आदिवासी सांस्कृतिक भवनाचे उदघाटन कोशयारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाल, आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब क्षीरसागर, सरपंच कांतीलाल खांडवी आदी उपस्थित होते.

वाचाः

यावेळी कोशयारी म्हणाले ‘ मुंबई सारख्या महानगराजवळ पालघर आहे. परंतु तेथील आदिवासी बांधवांना पाहिले की सर्व मुंबईकरांनी त्यांचे रक्त शोषलेय की काय अशी परिस्थिती पाहायला मिळते. शहरांपासून दूर आदिवासी भागात राहणाऱ्या या लोकांना वर्षांनूवर्षं पुढे जाण्याची संधीच मिळाली नाही.

वन कायद्यांत संशोधन गरजेचे
मला फॉरेस्ट वाल्यांची दया येते. त्यांच्या नावात रेस्ट असले तरी या विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आराम नाही. वृक्ष तोडू नये म्हणून त्यांना पहारा द्यावा लागतो. चूल पेटविण्यापूरती लाकडे आदिवासी बांधव तोडणार असतील तर काय हरकत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

वाचाः

झाडे उगवत असतील आणि माणसे मरणार असतील तर काय उपयोग, असे होत राहिले तर जंगलात माकडांचे राज्य येईल. वन कायद्यात सुधारणा होण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे, असे राज्यपाल यावेळी म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here