मुंबईः (coronavirus) संसर्गाबाबत आज राज्यातील जनतेसाठी मोठे दिलासादायक वृत्त असून आज राज्यात तब्बल ७ हजार ३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज राज्यात एकूण २ हजार ९९२ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. म्हणजेच नवे रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तिपटीहून अधिक आहे. तसेच आज राज्यात एकूण ३० करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काल देखील ही संख्या ३० इतकीच होती. (maharashtra registered 2,992 new cases in a day)

आज बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ४३ हजार ३३५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५८ टक्के इतके झाले आहे. तसेच राज्याचा मृत्यूदर २.५२ इतका आहे.

याबरोबरत आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४७,६४,७४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,३३,२६६ (१३.७७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या राज्यात १,८२,१८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच २,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here