मुंबई महानगरपालिकेनं यंदा ३९, ३८ ,८३ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. यंदा पालिकेच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी काही महत्त्वाच्या घोषण्या केल्या आहेत. पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता घरातील सर्वसाधारण करातून सूट देण्यात आलेली आहे मात्र, संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्यात आलेला नाही. हाच धागा पकडत भाजपनं शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
वाचाः
‘५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता करातून सूट दिलीच नाही. हे महापालिका आयुक्तांनीच उघड केलं आहे, असं म्हणत शिवसेनेनं मुंबईकरांना वाऱ्यावर सोडलं आहे,’ अशी बोचरी टीका दरेकर यांनी केली आहे.
प्रवीण दरेकर यांनी अर्थसंकल्पांच्या तरतुदींवरही टीका केली आहे. ‘शिवसेनेनं मुंबईकरांच्या खिशावर दरोडा घातला आहे. सेवा शुल्कात मोठी वाढ होणार. शिवसेनेनं सामान्य, गरीब मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नांच्या केला चक्काचुर, नवीन इमारत परवानगी छाननी शुल्कात वाढ केली आहे,’ असं दरेकरांनी म्हटलं आहे.
वाचाः
‘छाननी शुल्क एफएसआयवर न आकारता इमारतीच्या बाजारभावानुसार असलेल्या किंमतीवर आकारले जाणार, नवीन इमारतींच्या बांधकामानंतर अग्नी आणि जीव संरक्षण उपाययोजनांची पाहणी आणि परवानगीच्या शुल्कात वाढ, घरांच्या किमती भरमसाठ वाढणार,’ या मुद्द्यांवरही दरेकरांनी लक्ष वेधलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times