करुणा शर्मा यांच्या सोबत असलेल्या विवादासंदर्भात मी स्वतः उच्य न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यावर उच्च न्यायालयाने मद्रास उच्य न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणून नियुक्ती सुद्धा केली असल्याचे मुंडे यांनी खुलाशात म्हटले आहे.
या मेडिएशनच्या आतापर्यंत दोन बैठका झालेल्या असून येत्या १३ फेब्रुवारी २०२१ रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएशनमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर सर्व मुद्द्यांवर चर्चा होऊन निर्णय येणार आहे, अशी माहिती देतानाच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांसमोर मेडिएशनची प्रक्रिया सुरु असताना अशा प्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे यामागील हेतूबद्दल शंका निर्माण करणारे आहे, असे मुंडे यांनी पुढे म्हटले आहे.
मुळात जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे समोरच्या विरोधी पक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसून निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतू यात दिसून येत असल्याची टिप्पणीही मुंडे यांनी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे. यामुळे याप्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतूने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नसल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times