म. टा. प्रतिनिधी,

जवळ कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका बसला बुधवारी सायंकाळी ७.४० च्या सुमारास अचानक आग लागली (a bus caught fire). आगीची घटना समजताच अग्निशमन दलाचे पथक पोहोचले. यावेळी बसमधील सुमारे ४० प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसला लागलेली आग सायंकाळी ८.०६ च्या सुमारास विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ( near , reported)

आगीत जळून खाक झालेल्या या बसमध्ये कोस्टल रोडसाठी काम करणारे एल ॲन्ड टी चे कामगार होते. ड्युटी संपल्यानंतर हाजीअली येथून या कामगारांना ही बस घेऊन निघाली होती. ही बस महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली आणि रेल्वे स्थानकाचा पूल चढत असताना इंजिनमधून धूर आणि वास येऊ लागला. हे लक्षात येताच चालकाने पूलावर रस्त्याच्या कडेला बस थांबवली. सर्व कामगारांना तत्काळ खाली उतरविण्यात आले. सर्व खाली उतरल्यानंतर बसने पेट घेतला. यामध्ये कुणीही जखमी झाले नसल्याचे ताडदेव पोलिसांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

बसच्या चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना खाली उतरवून बस रिकामी केल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here