वाचा:
तिरोडा तालुक्यातील लोणारा गावात मंगळवारी ही घटना घडली आहे. मुलीला खाऊ खाण्यासाठी ५ रुपये न दिल्याने ती रडू लागली. त्यामुळे रागाच्या भरात पित्याने मुलीला ‘जा मर’ असे म्हणून जोरात दारावर आपटले. त्यात गंभीररित्या जखमी झालेल्या मुलीचा नंतर मृत्यू झाला. (वय २८) रा. लोणारा असे आरोपी पित्याचे नाव असून वैष्णवी विवेक उइके (वय १ वर्ष ८ महीने) असे मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी मृत मुलीची आई वर्षा विवेक उके (२२) हिने तिरोडा पोलीस ठाण्यात आज तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी पिता विवेक विश्वनाथ उइके याला अटक केली आहे. याप्रकरणी तपास सहायक पोलीस निरीक्षक हनुवते करीत आहेत.
वाचा:
पत्नीने दिली तक्रार
पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, वर्षा व आरोपी विवेक यांचे लग्न २०१८ मध्ये झाले. या दाम्पत्याला वैष्णवी ही मुलगी झाली. मात्र, पती दारू पिऊन सतत भांडण करत असल्याने व मारहाण करत असल्याने कंटाळून लग्नानंतर वर्षभरानंतर वर्षा ही माहेरी खडकी (पालोरा, ता. मोहाडी, जि. ) येथे वडील घनश्याम कंगाले यांच्याकडे राहायला गेली. दरम्यान, एके दिवशी विवेकने मेव्हणा राकेश घनश्याम कंगाले याला फोन करून पत्नी वर्षा व मुलीला लोणारा येथे आणून सोडण्यास सांगितले. त्यानुसार डिसेंबर २०२० मध्ये वर्षा व आपल्या भाचीला राकेशने विवेककडे आणून सोडले. तेव्हापासून मुलीसह ती पतीकडेच राहत होती. वर्षाची सासू ताराबाई विश्वनाथ उइके (वय ५५) व दीर शुभम विश्वनाथ उइके (वय २५) हे दोघे वेगळे राहतात तर सासरे विश्वनाथ उइके (६०) हे कामानिमित्त बाहेरगावी असतात. वर्षा वनमजुरी करून आपले व चिमुकल्या मुलीचा उदरनिर्वाह सांभाळत होती. असे असतानाच मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली.
वाचा:
नेमकं काय घडलं?
मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी विवेक सकाळी ८ वाजता कोडेलोहारा येथे लग्नासाठी गेला होता. लग्न समारंभ आटोपून सायंकाळी साडेसहा वाजता तो घरी परतला. सायंकाळी ७ वाजता मुलीला खाऊ घेऊन देण्यासाठी वर्षाने पती विवेककडे ५ रुपये मागितले. तेव्हा पतीने पैसे दिले नाहीत. त्यामुळे मुलगी जोरजोरात रडू लागली. त्यामुळे रागाच्या भरात पती विवेकने मुलगी वैष्णवीला पत्नी वर्षाकडून आपल्याकडे खेचून घेतले व विनाकारण का रडते असे म्हणत मुलीला जोरात दारावर आपटले. तिथे पत्नी वर्षा व चिमुकलीची आजी ताराबाई उपस्थित होत्या. वर्षाने पतीला अडविण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिलासुद्धा ढकलल्याने ती बाजूला पडली. मुलगी वैष्णवी पायरीजवळ पडली होती. तिच्या डाव्या गालावर व डोक्यावर इजा झाल्या होता. बेशुद्धावस्थेत पडलेल्या वैष्णवीला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करत असताना पती विवेकने पुन्हा पत्नी वर्षाला मारहाण केली. त्यानंतर विवेक व सासूने मुलीला दवाखान्यात नेतो म्हणून सांगितले व ते तिथून निघून गेले. दरम्यान, काही वेळाने मुलीला घेऊन परत आले असता मुलगी मरण पावली होती.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times