वाचा:
सत्तारुढ गटाने अगदी सुरुवातीलाच विरोधकांनी कोणताही प्रश्न विचारावा, उत्तर द्यायची आमची तयारी असल्याचे स्पष्ट केले. मागील सभेचे इतिवृत्त वाचण्यास सुरुवात झाल्यानंतर सभेत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. मागील वर्षी सभा झालीच नाही, सभा गुंडाळली होती, मग कसले इतिवृत्त वाचता असे म्हणत हा गोंधळ वाढत गेला. मागील वर्षी सभा झाली असून त्याला सरकारने मान्यता दिली असल्याचे संचालकांनी सांगितले. पण, विरोधकांचे समाधान न झाल्याने अखेर सभा आटोपती घ्यावी लागली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक अरूण नरके होते.
वाचा:
दरम्यान,गेल्यावर्षी महापुराची स्थिती, यंदा संसर्गाचं संकट अशा आपत्तीच्या कालावधीतही या दूध संघाची वार्षिक उलाढाल २३८३ कोटींवर पोहोचली. यामुळे गोकुळच्या यशाची कमान उंचावल्याचे अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक यांनी सांगितले. दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सभेकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. सभेत कोणताही गोंधळ होवू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना स्थळी सभा झाली.
वाचा:
नरके यांनी सभासदांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या परवानगीने कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी सभेपुढील विषयांचे वाचन करण्यास सुरुवात केली. मागील सभा झालीच नाही, मग इतिवृत्तांत मंजूर कसा? सभा झाली नसताना विषयांना मंजुरी कशी मिळाली? जी सभा झाली नाही, त्याचे प्रोसेडिंग काय लिहिले ते वाचा अशी मागणी कृती समितीतील , किरणसिंह चव्हाण, सदाशिव चरापले आदींनी केली. त्यांनी काही मंडळीसह व्यासपीठासमोर येऊन विरोध सुरू केला. त्यावर सभाध्यक्ष नरके यांनी मागील सभा झाली आहे, त्या विषयाला मंजुरी आहे. सरकारने इतिवृत्त मंजूर केले आहे, अशा शब्दांत समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधक मागील इतिवृत्तांत वाचा, त्या सभेची चित्रफित दाखवा, अशी मागणी करु लागले. यामुळे सभेत काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times