वाचा-
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली लढत ५ फेब्रुवारीपासून चेन्नईत होणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे. कारण या मालिकेतूनच जूनमध्ये लॉडर्सवर होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमधील न्यूझीलंडविरुद्ध लढणाऱ्या संघाचा निर्णय होणार आहे.
वाचा-
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी अजिंक्य रहाणे म्हणाला, माझे काम आहे विराटची मदत करणे. माझे काम आता सोपे झाले आहे. जेव्हा विराट काही विचारेल तेव्हा मी त्याला सांगेन. विराट कोहली कर्णधार होता आणि कौटुंबीक कारणांमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून भारतात परतला होता. त्यामुळेच मी ऑस्ट्रेलियात कर्णधाराच्या भूमिकेत होतो.
वाचा-
ऑस्ट्रेलियात मिळवलेला विजय हा आता भूतकाळ आहे. आम्ही आता इंग्लंड संघाचा सम्मान करतोय. ज्यांनी श्रीलंकाचा पराभव केला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी अद्याप पाच महिन्यांचा कालावधी आहे. न्यूझीलंडचा संघ फार चांगला खेळला आहे.
वाचा-
चेन्नईत होणाऱ्या पहिल्या कसोटीत फिरकीपटूंना मदत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संघात अक्षर पटलेला संधी मिळेल का या प्रश्नावर अजिंक्य म्हणाला, आम्ही संघा निवडीबाबत उद्या (गुरुवार) सराव झाल्यानंतर निर्णय घेऊ.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times