वाचा:
काही दिवसांपूर्वी एका महिलेने मुंडे यांच्याविरूद्ध तक्रार केली होती. त्यावरून राज्यभर रान पेटले होते. त्यावेळी तृप्ती देसाई यांनीही मुंडेंवर टीका केली होती. मात्र, काही काळानंतर सदर महिलेने तक्रार मागे घेतली. त्यामुळे मुंडे यांचे जल्लोषात स्वागत आणि सत्कार होऊ लागले. आता दुसऱ्या महिलेने मुंडे यांच्याविरूद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे ते पुन्हा अडचणीत आले आहेत. हा धागा पकडून देसाई यांनी पुन्हा मुंडे यांच्यावर आणि सोबत मुंडे यांचा सत्कार करणाऱ्यांवर टीका केली आहे.
वाचा:
‘मुंडे यांचे मोठे सत्कार आणि जल्लोषात स्वागत करताना काही लोक दिसत आहेत. मुंडे हे पराक्रमी योद्धा आहेत, अशा पद्धतीने त्यांचे स्वागत केले जात आहे. परंतु, त्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवून त्यातून त्यांना दोन मुले आहेत याची कबुली स्वतःच दिलेली होती. त्यानंतरही तक्रार करणाऱ्या महिलेलाच बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांकरवी झाला होता. आता पुन्हा दुसऱ्या महिलेने तक्रार अर्ज दिला आहे. त्यामुळे मुंडे यांचे जल्लोषात स्वागत करणारे आणि मोठमोठे सत्कार करणाऱ्यांची मानसिकता आपल्याला तपासावी लागेल. असेच चालू राहिले तर भविष्यात एखादा नेता वा मंत्र्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर वा तो आरोपी ठरल्यानंतरही त्याचं स्वागत केलं जाईल’, अशा शब्दांत देसाई यांनी टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी परिवार संवाद साधताना, राष्ट्रवादी पक्षातील मंत्र्यांचे परिवार सुरक्षित आहेत का, हे पण पाहिले पाहिजे आणि त्याविरोधात राष्ट्रवादीतील सर्व महिला नेत्यांनी आवाज उठवला पाहिजे, असे आवाहनही देसाई यांनी केले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times