केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला अनेकांनी विरोध केला आहे. यात पर्यावरण आणि जल यासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या भाचीचा यांचा देखील समावेश आहे.
वाचा-
रिहानाने भारतातील गोष्टीत लक्ष घालू नये याबद्दल माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा आणि अन्य बॉलिवडूमधील स्टार देखील सोशल मीडियावर बोलले आहेत. आता गॉड ऑफ क्रिकेट सचिनने यासंदर्भात ट्वीट केले.
भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. परदेशातील व्यक्ती फक्त पाहू शकतात पण त्यात भाग घेऊ शकत नाहीत. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिनने सोशल मीडियावर म्हटले आहे.
वाचा-
वाचा-
कृषी कायद्यावर परेदशातील अनेक लोकांनी विरोध केलाय. यावरून भारतीय लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने लोकांना सत्य जाणून न घेता प्रतिक्रिया देऊ नये असा सल्ला दिला आहे.
वाचा-
दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या प्रकरणी अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. यात काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. रिहानाने दोन फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात आंदोलन करणारे शेतकरी दिसत आहेत. रिहानाने आपण याबद्दल का बोलत नाही असा प्रश्न विचारला होता.
वाचा-
रिहानाच्या या पोस्टवर भारताचा माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा (pragyan ojha )ने उत्तर दिले आहे. आमचा देश शेतकऱ्यांवर गर्व करतो आणि आम्हाला माहिती आहे की तो किती महत्त्वाचा आहे. २०२० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या ओझाने रिहानाला उत्तर देताना म्हटले आहे की, मला विश्वास आहे की हा प्रश्न लवकरच मिटेल. आमच्या अंतर्गत प्रश्नात बाहेरच्या व्यक्तीने लक्ष घालण्याची गरज नाही.
वाचा-
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मोठा राडा झाला होता. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच बरोबर आंदोलन करणाऱ्या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद गेली गेली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times