वर्धा: भाजपकडून मुख्यमंत्री यांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत असताना नेते यांनी मंगळवारी अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली व भाजपवर जोरदार शब्दांत निशाणा साधला. ( )

वाचा:

सुधीर मुनगंटीवार हे मतदारसंघातील प्रश्न घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटले होते. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिवसेनेसोबतच्या मैत्रीबाबत मुनगंटीवार यांनी महत्त्वाचे विधान केले होते. ‘शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष शेवटच्या श्वासापर्यंत शत्रू नाहीत. भाजप व शिवसेनेचे काय होते ते पुढे बघू पण हिंदुत्वाचा आणि जनतेचा आवाज कधी ना कधी दोन्ही पक्षांना ऐकावा लागेल’, असे मुनगंटीवार म्हणाले होते. शिवसेनेबाबत जी माझी भूमिका आहे तीच देवेंद्र फडणवीस यांचीही असणार, असे विधानही त्यांनी केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक तर्क लावले जात आहेत. या घडामोडीनंतर आणि भाजपमधील तणाव बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो, असेही बोलले जात आहे. यावर जयंत पाटील यांनी आज नेमक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.

वाचा:

भाजपला सध्या राज्यात शिवसेनेशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळेच भविष्यात शिवसेना आपल्यासोबत येईल, या आशेवर भाजपचे नेते आहेत. त्यातूनच हे सगळं चाललं आहे, असा टोला पाटील यांनी लगावला. भाजपच्या राज्यातील नेत्यांना सध्या निराशेने ग्रासले आहे. शिवसेनेच्या जवळ जाण्याची त्यांची धडपड चालली आहे. म्हणूनच मतदारसंघातील कामांचे निमित्त करून भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. अशा भेटीतून वातावरण निर्मिती करायची आणि त्याचा फायदा उठवायचा, असाच भाजपचा डाव दिसतोय, अशी टोलेबाजीही पाटील यांनी केली. दुसरीकडे महाविकास आघाडीचा तिसरा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने या भेटीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here