कोरबा, : छत्तीसगडच्या जिल्ह्यातून सामूहिक बलात्कार आणि निर्घृण हत्येचं आणखी एक प्रकरण समोर आलंय. या प्रकरणात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची दगडकाठ्यांनी मारहाण करत अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. आरोपींनी मुलीच्या वडिलांची तसंच त्यांच्या चार वर्षांच्या नातीचीही हत्या केली आहे.

कोरबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेमरू पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गढुपरोदा गावात ही घटना घडली. २९ जानेवारी घडलेल्या या घटनेची माहिती मंगळवारी २ फेब्रुवारी रोजी समोर आली. त्यानंतर या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संतराम मझवार (४५ वर्ष), अब्दुल जब्बार (२९ वर्ष), अनिल कुमार सारथी (२० वर्ष), परदेसी राम पनिका (३५ वर्ष), आनंद राम पनिका (२५ वर्ष) आणि उमासंकर यादव (२१ वर्ष) अशी आरोपींची नावं आहेत. हे सर्व आरोपी सतरेंगा गावचे रहिवासी आहेत.

पीडित आदिवासी कुटुंब कोरबा समुदायाशी संबंधित आहेत. पीडित कुटुंब बरपानी गावात स्थायिक होते आणि मुख्य आरोपी संतवार मझवार याच्या घरी हे आदिवासी कुटुंब गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून गुरे चरण्याचं काम करत होतं.

प्राथमिक माहितीनुसार, मझवार २९ जानेवारी रोजी मृत १६ वर्षीय मुलगी, तिचे वडील आणि त्यांची चार वर्षांची नात यांना मोटारसायकलवर त्यांच्या घरी सोडण्यासाठी निघाला होता. रस्त्यातच त्यानं कोरइ गावात थांबून मद्य प्राशन केलं. त्याला इतर आरोपींचीही सोबत मिळाली. त्यानंतर आरोपींनी तीनही पीडित व्यक्तींना गढुपरोदाजवळच्याच जंगलात नेलं. इथे मझवार आणि इतर आरोपींनी १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिघांवरही दगड-काठ्यांनी हल्ला करत त्यांना जंगलात फेकून दिलं आणि घटनास्थळावरून पसार झाले.

मृतांच्या कुटुंबीयांनी तीन जण बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्यानंतर या घटनेचा तपास सुरू झाला. पोलीस तपासात सामूहिक बलात्कार आणि हत्येची गोष्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतलं.

आरोपींना घेऊन पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांना पीडित १६ वर्षीय मुलगी जिवंत असल्याचं लक्षात आलं. मुलीच्या वडिलांचा आणि चार वर्षांच्या मुलीचा मात्र मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्वरीत हालचाली करत पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केलं. परंतु, इथे मात्र पीडित मुलीनं उपचारादरम्यान प्राण सोडले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here