मुंबईः यानं हिंदुविरोधी केलेल्या वक्तव्यांनंतर भाजपनं त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली असून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनं शर्जिलला पळून जाण्यास मदत केली, असा गंभीर आरोप नेते यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘शर्जिल उस्मानीला महाराष्ट्र आणि मुंबईबाहेर पळून जाण्यासाठी मदत करण्याचं पाप महाविकास आघाडीनं केलं आहे. शर्जीलला पळून जायला दिल्यानंतर व भाजपनं दोन दिवस आंदोलन केल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करु म्हणणं म्हणजे पश्चातबुद्धी आहे. शिवसेनेने हिंदूना सडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचं काम का केलं स्पष्ट करावं,’ अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

‘शर्जिलने केलेल्या अवमानकारक टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणं याचा अर्थ यांचं डोकं ठिकाणावर आहे का?, अटक केली जाईल म्हणजे कधी आम्ही मागणी केल्यावर. परंतु, परिषदेला परवानगीच का दिली?,’ असा संतप्त सवाल शेलारांनी केला आहे.

वाचाः

दरम्यान, भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आतंरराष्ट्रीय कलाकारांनीही याची दखल घेत ट्विट केलं आहे. या ट्विटनंतर भारतात दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. काही राजकीय पक्षांनी याचं स्वागत केलं आहे तर, भाजपनं यावर टिप्पणी केली आहे. आशिष शेलार यांनीही यावर भाष्य करत शिवसेनेला सुनावलं आहे. शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे. ‘महाराष्ट्रावर परराज्यातून कोणी टीका केली तर यांना महाराष्ट्रद्रोह आठवतो. पण परदेशातून कोणी आपल्या देशातील विषयावर टिप्पणी, बदनामी केली तर यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. हे परदेशातील कनेक्शन काय आहे हे राऊतांनी जनतेसमोर मांडावं,’ असं म्हणत शिवेसेनेवर निशाणा साधला आहे.

वाचाः

यावेळी शेलारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली आहे. ‘सुप्रिया सुळे यांनी आंदोलक शेतकऱ्यांना जरुर भेटावं. हरकत नाही. पण बारामतीत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला परवानगी का दिली आहे? बारामतीत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग फायदेशीर ठरते आणि देशात ती चुकीची कशी ठरते, याचं उत्तर सुप्रिया सुळेंनी द्यावं,’ असं शेलारांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here