मुंबईः केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल परदेशातील सेलिब्रिटींनी घेतली असून त्यांना पाठिंबा दर्शवल्यानंतर भारतीय कलाकारांनी आतंरराष्ट्रीय कलाकारांना फटकारले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सेलिब्रिटींना एक सल्ला दिला आहे.

‘भारतीय नागरिक म्हणून मी कलाकारांच्या मतांचा आदर करतो. भारतीय कलाकार सांगताहेत की हा आमच्या देशाचा अंतर्गत मुद्दा आहे. मग तुम्ही तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला. तुमच्या देशाचा प्रश्न आहे तर आधी तुम्ही बोलते व्हा. मग परदेशातील कलाकारांना बोला,’ असा सल्ला भुजबळांनी दिला आहे.

तसंच, ‘सीमेवर खिळे ठोकण्यात आलेत असून यावरही भुजबळांना भाष्य केलं आहे. कटारी सीमेवर खिळे ठोकण्यात आलेत हेच जर चीनच्या बॉर्डवर केलं असतं तर त्यांनी गाव वसवलं नसतं. शेतरी आपले काही दुष्मन नाही ते आपले अन्नदाते आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

वाचाः

शर्जिल उस्मानी यांच्या भाषणामुळं मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. भाजपनं शर्जिलला अटक करण्याची मागणी केली असून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. यावरही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बोलण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहे, कधीही कोणावर टीका करताना, धर्माबाबत बोलताना शब्दांच्या बाबतीत जागृत राहणे गरजेचे आहे, बोलताना शब्द जपून वापरायला हवेत, शर्जिलला मनुवादावर बोलायचे होते, पण शब्द जपून वापरायला हवे, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, शर्जिलवर कोणते कलम लावायचे हा पोलिसांचा प्रश्न आहे, पोलीस चौकशी करुन योग्य ती कारवाई करतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here