पिंपळे गुरव येथील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. पोलिसांनी जवळपास २० दिवस यासंबंधी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत ठोस माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी पोलिसांनी हडपसर येथील एका सामाजिक संस्थेचे दोन आणि २ पोलीस अशा चार जणांना बनावट ग्राहक म्हणून त्या ठिकाणी पाठवले.
वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. एकूण १६ नायजेरियन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील चार जणी या १२ तरुणींना देहविक्रीसाठी जबरदस्ती करत असल्याची माहिती उघड झाली. पोलिसांनी त्या चार महिलांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी या कारवाईत ४० हजारांची रोकड, बनावट ग्राहकांकडील सहा हजारांची रोकड, सात मोबाइल आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times