सातारा: जावळी-सातारा मतदारसंघाचे आमदार भाजपमध्ये गेल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसनं शशिकांत शिंदेच्या रूपानं तिथं पुन्हा एकदा ताकद उभी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून शिवेंद्रराजे व असा सामना रंगला आहे. शिवेंद्रराजे यांनी विरोधकांना संपवण्याची भाषा केल्यामुळं या वादाला अधिकच धार चढली आहे. ( Gives Befitting Reply to )

कुडाळमधील एका मेळाव्यात बोलताना शिवेंद्रराजे यांनी प्रथमच आक्रमक भाषा वापरली. ‘माझी वाट लागली तरी चालेल, पण मला त्रास द्यायचा प्रयत्न कुणी करत असेल, तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवेन. काट्यानं काटा कसा काढायचा, हे मलाही माहीत आहे. मी कुणालाही घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवून निवडून आलो आहे हे विसरू नका, असं शिवेंद्रराजे यांनी म्हटलं होतं. त्यांचा रोख शशिकांत शिंदे यांच्याकडं असल्याचं बोललं जात होतं.

वाचा:

याबाबत शशिकांत शिंदे यांना विचारलं असता, शिवेंद्रराजे माझ्याबद्दल काही बोलले आहेत असं वाटत नाही. त्याचं माझं वैयक्तिक कुठलंही भांडण नाही. मात्र, पक्षपातळीवर विरोध असू शकतो ते नाकारता येणार नाही. आज ते भाजपमध्ये आहेत आणि मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. माझ्या पद्धतीनं साताऱ्यात पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये पक्ष मजबूत करण्याची माझी भूमिका आहे. अनेक लोक माझ्याकडं प्रश्न घेऊन येत आहेत. मी ते सोडवत आहे. याचा अर्थ मी शिवेंद्रराजे यांना आव्हान देतोय, असं समजण्याचं काही कारण नाही. मला माझा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. यापुढंही मी काम करत राहणार आणि त्यासाठी कोणतंही आव्हान स्वीकारण्यास तयार आहे,’ असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. ते ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

वाचा:

पूर्वी जावळीचे आमदार असलेले शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंसाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तिथं ते निवडूनही आले होते. २०१९ च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. तर, शिवेंद्रराजे यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं शशिकांत शिंदे यांना विधान परिषदेवर संधी देऊन जावळी मतदारसंघात लक्ष घालण्यास सांगितलं आहे. त्यातूनच राजकीय वातावरण तापल्याचं बोललं जात आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here