भाई जगताप यांनी ट्विट करत हा टोला लगावला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये लिहितात, ‘आज साक्षात प्रभू रामचंद्र जरी पृथ्वीवर अवतरले व त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली, तरी भक्त आणि दलाल माध्यमे त्यांना खलिस्तानी, देशद्रोही आणि काँग्रेसी ठरवतील… इतका स्वत:च्या डोक्यावर परिणाम करून घेतला आहे या भक्तांनी.’
क्लि करा आणि वाचा-
अमेरिकन पॉप सिंगर रिहाना हिने ट्विटरवरुन या भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात भाष्य केले. त्यानंतर भारतीय सेलिब्रिटींनी या मुद्द्यावर भाष्य करत भारतीय सेलिब्रिटींनी देशातील नागरिकांना एकजूट दाखवण्याचे आवाहन केले आहे. रिहानाने ट्विट केल्यानंतर अनेक भारतीय सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भारत देश हा आंतरराष्ट्रीय पातळीवर रचण्यात येणाऱ्या कटाविरोधात एकजुटीने उभा आहे असा मजकूर असलेले ट्विट या सेलिब्रिटींनी केले आहेत. यात भारतरत्न सचिन तेंडूलकर, ग्रानसम्राज्ञी लता मंगेशकर, विराट कोहली, अक्षय कुमार, करण जोहर, सुनील शेट्टी, तसेच भाजपाचे अनेक नेत्यांनीही अशा प्रकारचे ट्विट केले आहे. यात समर्थक आणि सरकारचे समर्थकही पुढे आले आहेत. यावरुनच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजप आणि सरकार समर्थकांचा भक्त असा उल्लेख करत टीका केली आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times