औरंगाबादः औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन मनसेनं आता आक्रमक भूमिका घेतली असून शिवसेनेचे माजी खासदार यांच्या गाड्यांचा ताफा अडवत औरंगाबाद शहराचे नामांतर कधी होणार, अशा जाब विचारत त्यांच्या अंगावर पत्रके उधळली आहेत.

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या नामांतराची मागणी जोर धरु लागली आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करा अशी मागणी शिवसेनेनं केल्यानंतर आता मनसेनंही आक्रमक भूमिका घेत नामांतरासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.

वाचाः

क्रांतीचौक येथे चंद्रकांत खैरे यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी अडवून औरंगाबादचे नाव संभाजीनगर का करत नाही?, असा सवाल केला. यावेळी आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करत चंद्रकांत खैरेंच्या अंगावर औरंगाबादचे नामांतर झालेच पाहिजे, अशी पत्रके उधळली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, शहराध्यक्ष सतनाम गुलाटी यांची उपस्थिती होती. मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेविरोधात घोषणाबाजीही केली.

वाचाः

काय आहे नेमका वाद?

शिवसेनेकडून औरंगाबादचा उल्लेख हा नेहमीच संभाजीनगर म्हणून करण्यात येतो. तर, काँग्रेसनं औरंगाबादच्या नामांतरासाठी ठाम विरोध केला आहे. महाविकास आघाडीतच नामांतरावरुन दोन भूमिका असल्यानं हा वाद चांगलाच पेटला आहे. दरम्यान, या सगळ्या वादात मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटर हँडलवर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा उल्लेख वारंवार केला जात आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here