राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत पुन्हा एकदा खाते वाटप करण्यात येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. काँग्रेसला उपमुख्यमंत्री तर शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. यावर भाजपने निलेश राणे यांनी एक ट्विट करत अजित पवारांवर टीका केली आहे.
वाचाः
‘अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं. पण आता दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे. म्हणजे अजित पवार यांची परत नॉट रिचेबल होण्याची वेळ आली, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे. तसंच, काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.
नाना पटोले यांनी अखेर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभाध्यक्षपद कुणाला मिळणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे. हे पद काँग्रेसकडेच राहणार की शिवसेनेकडे जाणार, अशीही चर्चा होऊ लागली आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times