राजीनामा सुपूर्द केल्यानंतर नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आपल्या राजीनाम्यावर माहिती देताना नाना पटोले म्हणाले की, पक्षाने मला आदेश दिल्यानंतर मी त्याचे पालन केले आहे. पक्षाने मला राजीनामा देण्यास सांगितले. त्यानंतर मी राजीनामा दिला. मी मंत्रिपदाची किंवा इतर कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही.
नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येण्याबाबतही पटोलेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून मला पक्षाकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. पक्ष जो आदेश देईल त्याचे मी पालन करेन असेही पटोले पुढे म्हणाले. आपण राजीनामा दिल्यानंतर आता विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडेच राहणार का?, असा प्रश्नही पटोलेंना विचारण्यात आला. त्यावर याबाबकचा निर्णय तीन पक्षांचे नेते मिळून घेतील. या संदर्भात तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल. त्यात हा निर्णय घेतला जाईल, असे सांगतानाच विधानसभेचा अध्यक्ष निवडण्याची निवडणूक प्रक्रिया अधिवेशन काळात होते असेही ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
‘माझ्या खुर्चीला मी जनतेची खुर्ची बनवली’
विधानसभा अध्यक्षपदावर काम करत असताना मी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीला जनतेची खुर्ची बनवली आणि याचा मला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रियाही पटोले यांनी राजीनाम्यानंतर व्यक्त केली.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times